तोतया पोलिसाची तरुणीला लग्नाची मागणी

On: March 18, 2022 1:47 PM

पंढरपूर : माझे वडील आयपीएस अधिकारी असून मी मंगळवेढा येथे पीएसआय असल्याची बतावणी करत भामट्या तरुणाने पोलिस दलात दाखल होण्यास इच्छुक तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. रमेश सुरेश भोसले असे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर शहर पोलिस स्टेशनला संशयीत आरोपी रमेश भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आपण पीएसआय असल्याचे भासवण्यासाठी त्याने खाकी गणवेश तयार करुन घेतला होता. याशिवाय त्याने बनावट ओळखपत्र आणि आधारकार्ड देखील तयार केले होते. तुला पोलिस भरतीसाठी मदत करतो असे म्हणत त्याने तरुणीला लग्नाची मागणी घालण्यास सुरुवात केली होती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सदर तरुणीने पंढरपुर पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची तोतयेगिरी समोर आली. त्याला अटक करण्यात आली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment