चोरीच्या दोन मोटारसायकली कट्टपाकडून हस्तगत

On: March 18, 2022 8:33 PM

जळगाव : संशयास्पदरित्या ताब्यात घेतलेल्या मोटार सायकल चोरट्याकडून दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. गौरव उर्फ कट्टपा राजु कुमावत (29) रा. दत्त नगर पहुर ता. जामनेर जि. जळगाव असे सदर मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पो.नि. किशोर पाटील व पो.कॉ. मुकेश पाटील  यांनी गस्तीदरम्यान त्याला संशयास्पदरित्या ताब्यात घेतले होते. एमआयडीसी आणि पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

16 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.ना. किशोर पाटील आणि पो.कॉ. मुकेश पाटील हे पेट्रोलिंग करत होते. दरम्यान अजिंठा चौफुलीनजीक त्यांना गौरव उर्फ कट्टपा हा बनावट चावीने एक मोटार सायकल चोरुन नेण्याच्या प्रयत्नात दोघांना दिसून आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याला या गुन्ह्याकामी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडी दरम्यान त्याने चोरीच्या एकुण दोन मोटार सायकल पोलिसांना काढून दिल्या. त्यातील एक गुन्हा एमआयडीसी तर दुसरा गुन्हा पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. किशोर पाटील, विकास सातदिवे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, पो.कॉ. मुकेश  पाटील,  चेतन सोनवणे  आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस नाईक विकास  सातदिवे करत आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment