प्रियकराच्या मदतीने सासु – सास-यांना विष देण्याचा प्रयत्न?

On: March 19, 2022 10:45 AM

नाशिक : नाशिकच्या शिवाजीनगर भागातील एका विवाहीतेने तिच्या प्रियकरासह आईच्या मदतीने सासु – सास-यांना विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न अर्थात धाडस केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सुनिल भिमराव भिसे (44) रा. शिवाजीनगर याने त्याची पत्नी संशयीत लता सुनिल भिसे हिच्यासह तिची आई जिजाबाई गुंजाळ (रा.नवले कॉलनी नाशिकरोड) व कथित प्रियकर संजयकुमार पंढरीनाथ पाटील (विश्वासनगर, अशोकनगर सातपुर) अशांविरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सुनिल भिसे याची पत्नी लता हिने त्याला आई वडीलांपासून विभक्त राहण्यासाठी तगादा लावला होता. 26 जानेवारी 2004 ते 18 जून 2020 या काळात तिने वारंवार वाद घालून शारिरीक व मानसिक त्रास तसेच विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. लता हिने स्वत: देखील विष प्राशन करुन आपले जीवन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment