नाशिकच्या व्यावसायीकाची 6 कोटी 80 लाखात फसवणूक

नाशिक : राजस्थान सरकार, पर्यटन विभागाच्या इ-टॉयलेटवरील जाहिरातींच्या ऑनलाइन टेंडरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या फायद्याच्या आमिषाला बळी पडून नाशिकच्या व्यावसायिकाची 6 कोटी 80 लाखात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार जोधपूर येथील एकुण पंधरा संशयितांविरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिल पाटील (रा.गंगापूर रोड नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन पुरुषोत्तमभाई वेलेरा (जोधपूर), वैभव गेहलोत (रा. जोधपूर), किशन कांतेलिया, सरदारसिंग चौहान, निडल क्राफ्ट कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी प्रवीणसिंग चौहान, सुहाभ सुरेंद्रभाई मकवाल, निरवभाई महेशभाई विर्माभट, बिस्वरंजन मोहंती, राजबीरसिंह शेखावत, प्रग्येशकुमार विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसाई, सावनकुमार पारनेर, रिशिता शाह, विराज पांचाल (पूर्ण पत्ता नाही) आदींविरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन 2018 ते 2020 या कालावधीत गंगापूररोड परिसरातील सुशील पाटील व त्यांच्याशी संबंधित इतर व्यावसायिकांना संशयितांनी संगनमताने राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीचे सर्व टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. सुशिल पाटील यांनी आपल्या सहकारी व्यावसायिकांना या टेंडरची माहिती दिली. या कालावधीत 3 कोटी 93 लाख 54 हजार 778 रुपये आरटीजीएसने संशयीतांच्या खात्यात जमा करण्यात आले. राहिलेली रक्कम रोखीने देण्यात आली होती. इ-टेंडर व्यवहार पुर्ण न करता सर्व संशयीतांनी मिळून फसवणूक केल्याबाबतच्या तक्रारीबाबत न्यायालयाच्या आदेशाने गंगापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here