चोरीच्या मोटार सायकलींसह तिघांना अटक

On: March 19, 2022 8:06 PM

जळगाव : चोरीच्या मोटार सायकली विकणारे दोघे आणि खरेदी करणारा एक अशा तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. समाधान जाधव रा. महादेवाचे बांबरुड ता. पाचोरा, शुभम अशोक सपकाळ, रोहन ज्ञानेश्वर पवार (दोन्ही रा. पातोंडा ता.चाळीसगाव) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

समाधान जाधव हा चोरीच्या मोटार सायकल विकत घेऊन वापरत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून शुभम अशोक सपकाळ आणि रोहन ज्ञानेश्वर पवार यांची नावे उघड झाली. अधिक चौकशीत तिघांकडून मिळालेल्या माहितीतून चाळीसगाव शहर, चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन धुळे आणि सरकारवाडा पोलिस स्टेशन नाशिक शहर अशा तिन ठिकाणी दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, पोना राहुल पाटील, प्रितम पाटील, रविद्र पाटील, सचिन महाजन, चालक विजय चौधरी, दिपक चौधरी, मुरलीधर बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. तिघा आरोपींना पुढील तपासकामी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment