गवळी गँगच्या हस्तकाची कारागृहात आत्महत्या

On: July 30, 2020 6:50 PM

पनवेल : गवळी गँगचा हस्तक दिनेश नारकर (36) या कैद्याने तळोजा कारागृहात आत्महत्या केल्याची घटना दि.29 च्या रात्री घडली. दि.20 रोजी सोमवारीच नारकरला तळोजा कारागृहात दाखल करण्यात आले होते. पत्नीच्या हत्येचा प्रयत्न व पोलिसांवर हल्ला करण्याच्या गुन्ह्याची नोंद नारकरच्या नावे होती. तळोजा कारागृहाच्या रुग्णालयातील एका खोलीत नारकरने कैद्यांना झोपण्यासाठी दिल्या जाणाऱ्या चादरीच्या साहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली.

या घटनेनंतर नारकर यास तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी नारकर यास मृत घोषित केले. गवळी गँगचा हस्तक असलेल्या अरुण नारकर याने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.खारघर पोलीस स्टेशन ला या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

हे हि वाचा गवळी गँगच्या हस्तकाची कारागृहात आत्महत्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment