जळगाव : एरंडोल शहरातील सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या प्लॉट व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. प्लॉट खरेदी व्यवहारात प्रा. रघुनाथ शंकर निकुंभ यांची 37 लाख रुपयांमधे फसवणूक झाल्याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आनंदा रघुनाथ चौधरी व राजेंद्र अमृत धनगर (दोन्ही रा. एरंडोल) अशी अटकेतील दोघा एजंटांची नावे आहेत. या व्यवहारात उमेश श्रीराम पाटील याचा देखील सहभाग असल्याचा आरोप आहे.