विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ कॉलप्रकरणी गुन्हा दाखल

On: March 23, 2022 11:07 AM

अमरावती : रोजगाराभिमुख शिक्षण देणा-या शैक्षणीक संस्थेतील दहा विद्यार्थीनींना चार अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन व्हिडीओ कॉल येण्याचा प्रकार सुरु होता. गेल्या दोन महिन्यापासून हा प्रकार सुरुच होता. कॉल रिसीव्ह केल्यानंतर पलीकडून अश्लिल चाळे दाखवले जात होते.

अखेर वैतागलेल्या सर्व दहा विद्यार्थीनींनी गाडगेनगर पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत मांडली. या घृणास्पद प्रकरणी विद्यार्थिनींनी दिलेल्या तक्रारीनुसार गाडगेनगर पोलिस स्टेशनला चार अनोळखी मोबाइल क्रमांक अश्लील हावभाव करणे यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment