दारु पाजून तरुणीवर अत्याचार – दोघा भावांविरुद्ध गुन्हा

On: March 23, 2022 11:59 AM

अहमदनगर : तरुणीला मद्यधुंद करुन तिच्यावर दोघा भावांनी अत्याचार केल्याची घटना नगर शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा भावांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तुषार तुकाराम चव्हाण व रोनक तुकाराम चव्हाण (दोघे रा. नक्षत्र लॉनजवळ, बुरुडगाव रोड, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा भावांची नावे आहेत.

पिडीत तरुणी घरी एकटीच असताना तुषार व रोनक हे दोघे भाऊ तिच्या घरात आले व म्हणाले, ‘आम्हाला जेवण करायचे आहे. त्यावेळी तरुणी त्यांना म्हणाली की ‘तुम्ही आधी घराबाहेर जा, माझ्या घरात तुम्हाला जेवण मिळणार नाही’. त्यावेळी तुषारने पिडितेला धरुन ठेवले आणि रोनकने तिला दारु पाजली. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment