गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व्हॉलींटीयरांना संधी

जळगाव : महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा, शांततापूर्ण सहजीवन आणि सहकारातून चैतन्य यासह विविध विषयांद्वारे गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गांधी विचाराचा प्रचार-प्रसार केला जात आहे. स्वातंत्र्य संग्रामासह महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित गांधी तीर्थ येथील खोज गांधीजी की हे जागतिक दर्जाचे म्युझियम आहे. या ठिकाणी अनेक अभ्यासक आणि पर्यटकांनी भेट दिली असून गांधी विचार पोहचविण्याचे कार्य सुरूच आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे शांती, अहिंसा, न्यायपूर्ण विश्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगातील व्हॉलींटियरांना त्यांना सेवाकार्य करण्याची संधी देत आहे. यातून महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या सेवाभावनेच्या विचारांना चालना मिळेल. सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

जागतिक पातळीवर शांततामय आणि वास्तवाला धरून बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आणि शांतता, न्याय, सुबत्ता आणि श्रमप्रतिष्ठा जपून काम करणाऱ्या व्हॉलींटीयरांसाठी ही उत्तम संधी आहे. समाजसेवेतून परिवर्तन घडविणाऱ्यांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन एक संधी देत आहे. या संधीचा लाभ घेतल्यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये सहभागी होता येईल. यात वाचनालय आणि अभिलेखागार, शैक्षणिक, संशोधन आणि रचनात्मक कार्य यामध्ये सामाजीक विकास, पाणलोट व्यवस्थापन, ग्रामीण आरोग्य कल्याण योजना, आरोग्य आणि ग्रामीण उद्योजकता यासह विविध क्षेत्रातुन महात्मा गांधीजींना अपेक्षित असणारी ग्रामस्वराज्य ही संकल्पना साकारता येईल. या सामाजिक कार्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन जगभरातून स्वयंसेवकांना आमंत्रित करित आहे. यासाठी https://forms.gle/DWTbLiBy3N8Vvg8Y6 लिंकवर नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी http://www.gandhifoundation.net या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येईल. व्हॉलींटियरांसाठी कालावधी एक ते तीन महिन्यांचा राहिल. स्वयंसेवकांचे वय 18 ते 70 या दरम्यान असावे. स्वयंसेकांनी काम पुर्ण केल्यावर त्यांना प्रशिस्तपत्र देण्यात येईल. व्हॉलींटियरांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था गांधी रिसर्च फाऊंडेशन करेल. विदेशी व्हॉलींटियरांनी प्रवास खर्च व व्हिसा अर्ज करण्यासाठीचा खर्च स्वत: करावयाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here