पुतणीवर अत्याचार करणारा काका अटकेत

On: March 25, 2022 11:12 AM

बीड :  मित्रासोबत असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती आई-वडिलांना देईन अशी धमकी देत पुतणीवर गेल्या चार वर्षापासून अत्याचार करणा-या काकाला अटक करण्यात आली आहे.

बिड तालुक्यातील पिडिता सध्या पुणे येथे राहण्यास आहे. 25 एप्रिल 2018 रोजी ती बीड तालुक्यातील गावी आली असता तिचे तिच्या मित्रासोबत असलेले प्रेमसंबंध काकाला समजले होते. तेव्हापासून काका तिच्यावर अत्याचार करत होता तसेच कुणाला काही सांगितले तर जीवे ठार करण्याची धमकी देखील देत होता. अखेर 23 मार्च रोजी बीड ग्रामीण पोलिस स्टेशनला पिडीतेने काकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अटकेतील आरोपीस 27 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment