एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; पगाराअभावी उपासमारीचे संकट

On: July 31, 2020 5:30 PM

सांगली : कोरोना महामारीच्या संकटातून सावरत देशाची हळूहळू अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. लॉकडाऊन काळात जिल्हा अंतर्गत एसटी ची सेवा देखील बंदच होती. गेल्या चार महिन्यापासून एस.टी.चे चाक जागेवरच थांबले असून अनेक कर्मचा-यांचे पगार रखडले आहेत
अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. इस्लामपूर आगारातील मेकॅनिक अमोल माळी (३५) याचा देखील गेल्या दोन महिन्यापासून पगार झालेला नव्हता. त्याच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट आले होते. त्यातून निराश झालेल्या अमोलने आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment