पैठण कारागृहातून कैदी पलायन प्रकरणी गुन्हा दाखल

On: March 29, 2022 8:04 AM

पैठण : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणा-या परभणी येथील कैद्याने पैठणच्या खुल्या कारागृहातून 27 ऑगस्ट रोजी पलायन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक दत्ताराव बोंगाणे रा. परभणी असे कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो पैठणच्या खुल्या कारागृहात शिक्षा भोगत होता.

पोलिस शिपाई साहेबराव लक्ष्मण फुसे व संतोष पुंजाराम ढाकणे (कारागृह शिपाई) असे दोघेजण पैठणच्या खुले कारागृह येथे रविवारी ड्युटीवर हजर होते. सायंकाळी सहापर्यत एकुण चार कैदी त्यावेळी हजर होते. त्यानंतर कारागृहातील पोलिस शिपाई साडेसहा वाजता परत आले असता तेथे तीन बंदी हजर असल्याचे त्यांना दिसून आले. होते. शिक्षाधीन कैदी अशोक दत्ताराव बोंगाणे याने पलायन केल्याचे आढळून आल्याने याप्रकरणी पैठण पोलिसांत गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment