अमरावतीत आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड

On: March 30, 2022 11:09 AM

अमरावती :  आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर अमरावती एलसीबी पथकाने सोमवारी रात्री टाकलेल्या धाडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहाटगाव परिसरातील हॉटेल वऱ्हाडी सावजी थाट फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅंन्ड बारवर टाकण्यात आलेल्या या धाडीत दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 91 हजार 200 रुपये रोख तसेच इतर साहित्य असा एकुण 3 लाख 64 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अमर ओमप्रकाश शिरभाते (38), रा. कल्याणनगर, अमरावती आणि राहुल ऊर्फ सन्नी राजेश नगरे (28), मच्छिसाथ, अमरावती अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. अटकेतील दोघांविरुद्ध नांदगाव पेठ पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे, पोलिस उप निरीक्षक राजकुमार येवले, नरेश मुंडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment