कुरियरने आल्या 37 तलवारी -औरंगाबादला गुन्हा दाखल

On: March 31, 2022 7:16 AM

औरंगाबाद : कुरियरने 37 तलवारी मागवण्यात आल्याचा प्रकार औरंगाबादला उघडकीस आला असून याप्रकरणी कुरिअर कंपनीच्या मॅनेजरसह एकुण सात जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या छापेमारीत आढळून आलेल्या तलवारी जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

लाकडी खेळणी मागवण्याच्या नावाखाली धारदार तलवारी मागवण्याचा प्रकार 9 ते 29 मार्च दरम्यान सुरु होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तलवारी वेळीच जप्त केल्याने भविष्यात होणारा अनर्थ टळला असून सतर्क राहण्याची गरज असल्याचे देखील या घटनेतून उघड झाले आहे. डीटीडीसी कुरिअरचा मॅनेजर वाल्मीक चोखाजी जोगदंड (44), रा. संजयनगर औरंगाबाद याच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मे 2018, जुलै 2021 व त्यानंतर आता तिस-यांदा औरंगाबाद येथे कुरिअरने तलवारी मागवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment