विवाहीतेच्या आत्महत्येप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव :  पतीच्या गैरहजेरीत परपुरुषाकडून वेळोवेळी होणारी छेडखानी, तिला व्हिडीओ कॉल करुन त्रास देणे अशा नेहमीच्या त्रासाला वैतागून विवाहितेने गळफास घेत केलेल्या आत्महत्येप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 मार्च रोजी घडलेल्या या आत्महत्येप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तौसिफ शाह तफज्जुल शहा रा. सालार नगर जळगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

जळगाव  शहरातील नशेमन कॉलनी भागात राहणा-या विवाहितेने तौसिफ शाह या सालार नगरातील संशयीताच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याचा आरोप आहे. संशयीत तौसीफ शाह हा नशेमन कॉलनी भागातील विवाहितेकडे वाईट नजरेने बघण्यासह तिची छेडखानी करत होता असा त्याच्याविरुद्ध आरोप आहे. याशिवाय तो आत्महत्या करणा-या विवाहितेला व्हिडीओ कॉल आणी व्हाटस अ‍ॅप मेसेज देखील करत होता असा त्याच्याविरुद्ध आरोप आहे. त्याच्या या त्रासाला वैतागून तिने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखली पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here