पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पोलिस कर्मचारी निलंबित

On: July 31, 2020 8:47 PM

जळगाव : पत्नीच्या मृत्यू प्रकरणी खुनाच्या गुन्हयातील संशयित पोलिस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे यास पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे. आशाबाबा नगर परिसरातील श्यामराव नगरात सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा जळून मृत्यू झाला होता. सदर घटना 10 जुलैच्या पहाटे घडली होती.

या घटनेत सुरुवातीला पोलीस कर्मचारी असलेला पती नरेंद्र भगवान सोनवणे, प्रमिलाबाई, भगवान सोनवणे, योगेश सोनवणे, स्वाती योगेश सोनवणे व सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द १३ जुलै रोजी रामानंद नगर पोलीसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चौकशीअंती या गुन्ह्यात २३ जुलै रोजी खुन व हुंडाबळीचे कलम वाढवण्यात आले. या घटनेतील कसूरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार डॉ. पंजाबराव उगले यांनी नरेंद्र सोनवणे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. या गुन्ह्यात अजून कुणाला अटक नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment