भुसावळला 2 कोटी रुपयांचा गुटखा जप्त

जळगाव : भुसावळ शहरालगत साकेगाव नजीक महामार्गावर करण्यात आलेल्या छापा कारवाईत सुमारे दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे 1 एप्रिल रोजी सदर कारवाई करण्यात आली.

तिन कंटेनरसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 3 कोटी 17 लाख 54 हजार एवढी आहे. यात गुटख्याची अंदाजे किंमत 2 कोटी 27 लाख 54 हजार एवढी आहे. अन्न व औषध प्रशासन अधिका-यांसमक्ष या मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला. या गुन्ह्यात हरियाना राज्यातील एक टॅंकर चालक अटकेत असून इतर फरार झाले आहेत. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here