तरुणाच्या चाकू हल्ल्यात पुजारी ठार

On: April 3, 2022 8:08 AM

अंबाजोगाई : गुढीपाडव्याच्या दिवशी पुजाअर्चा करुन घरी येत असतांना तरुणाने केलेल्या चाकूहल्ल्यात पुजारी ठार झाला आहे. संतोष दासोपंत पाठक (50) रा. रविवार पेठ अंबजोगाई असे ठार झालेया पुजा-याचे तर पांडुरंग अच्युत शेप (25) असे चाकूहल्ला करणा-या तरुणाचे नाव आहे. चाकूहल्ला करणारा तरुण पांडुरंग हा मनोरुग्ण असल्याचे म्हटले जात आहे.

घटनेपूर्वी संशयीत आरोपी पांडुरंग हा चाकूने बिट खात होत. पुजारी संतोष पाठक यांना पाहतच त्याने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. त्यात ते ठार झाले. दरम्यान काही महिलांनी पांडुरंग यास दगड मारुन चाकू हल्ल्यापासून प्रतिकार करण्याचा व पुजारी पाठक यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पांडुरंग यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध अंबजोगाई पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment