गुढीपाडव्याला व्यसनाधिन पित्याची मुलाने केली हत्या

On: April 4, 2022 10:28 AM

औरंगाबाद : वडीलांच्या मद्याच्या व्यसनाला कंटाळून मुलाने जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची घटना औरंगाबाद शहरानजीक चिंचोली गावात गुढीपाडव्याच्या दिवशी घडली. कडूबा घुगे (65) असे हत्या झालेल्या पित्याचे तर नानासाहेब घुगे (25) असे हत्या करणा-या संशयीत आरोपी असलेल्या मुलाचे नाव आहे. लोखंडी घन डोक्यात घालून सदर हत्येची घटना घडली आहे.

सतत मद्यसेवन करुन त्रास देणा-या कडूबा घुगे यांच्याशी त्यांचा मुलगा नानासाहेब याने गुढीपाडव्याच्या दिवशी वाद घातला होता. रागाच्या भरात नानासाहेब घरातून निघून गेला होता. त्यावेळी कडूबा घराबाहेर झोपले होते. रात्री साडेनऊ वाजता घरी आलेल्या नानासाहेब याने त्याचे वडील कडूबा यांच्या डोक्यात लोखंडी घन घालून जखमी केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment