रेव्ह पार्टी छाप्यात अभिनेत्यासह गायक ताब्यात

On: April 4, 2022 10:37 AM

हैदराबाद : हैदराबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमधे सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात एक तेलगू अभिनेता, एक गायक आणि इतर सुमारे 142 ग्राहक तसेच हॉटेलचे कर्मचारी ताब्यात घेण्यात आले आहेत.

या पार्टीत एका आयपीएस अधिका-याची मुलगी देखील होती असे समजते. या ठिकाणी अनेक जण अंमली पदार्थाचे सेवन करतांना पोलिसांना आढळून आले. जप्त करण्यात आलेली पावडर कोकेन असल्याचे म्हटले जात आहे. ताब्यातील सर्वांना बंजारा हिल्स पोलिस स्टेशनला आणले गेले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment