नाशिक : नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात तोतया महिला डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी झाल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनला फसवणूकीसह तोतयेगिरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रुग्णांच्या जिवीताशी हा एकप्रकारे भावनिक आणि वैद्यकीय उपचाराचा खेळ असून खळबळ उडाली आहे.
5 एप्रिल रोजी या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दोन महिलांसह एक तरुणी डॉक्टरच्या वेशात मेडिसीन विभागात रुग्ण तपासणी करत असल्याचे काही कर्मचा-यांच्या लक्षात आले. हा गैरप्रकार समजताच बाह्य रुग्णालयाच्या प्रमुख असलेल्या शेख यांनी त्यांना विचारले असता त्यांच्याकडे नियुक्तीचा कोणताही पुरावा नव्हता. हा प्रकार अतिरिक्त शल्य चिकीत्सक डॉ. श्रीवास यांच्याकडे गेला. अखेर हा प्रकार सरकारवाडा पोलिस स्टेशनला गेल्यानंतर तिघींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.