लग्नाचा तगादा लावणा-या प्रेयसीसमक्ष प्रियकराची आत्महत्या

On: April 7, 2022 12:43 PM

अमरावती : पळून जावून लग्न करण्याचा सतत तगादा लावणा-या प्रेयसीसमक्ष प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 5 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी राजापेठ पोलिस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जयेश दादलानी असे असे आत्महत्या करणा-या प्रियकराचे नाव आहे. शामकुमार नानकलाल दादलानी यांच्या फिर्यादीनुसार प्रेयसी असलेल्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

जयेश दादलानी या तरुणाचे एका तरुणीशी काही वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते. जयेशचे नातेवाईक दोघांचे लग्न करुन देण्यास राजी होते. मात्र पळून जावून लग्न करण्यासाठी त्याची प्रेयसी त्याच्यावर सारखी दडपण आणत होती.पळून जावून लग्न केले नाही तर आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याची ती धमकी देत होती. तिच्या त्रासाला वैतागून जयेश याने तिच्यासमक्षा गळफास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment