नोकरांच्या मदतीने मोठ्या भावाचा खून ; तिघांना अटक

On: August 1, 2020 8:25 PM

ठाणे: दुकानात नोकरासमोर वारंवार अपमान करणे , मनाविरुद्ध दुकानाचे कामकाज करण्याच्या रागातून लहान भावाने नोकरांच्या मदतीने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात घडला. रात्री उशिरा मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. महेश चावला (४८) आणि अनिल चावला (४५) या दोन्ही सख्ख्या भावांचे कोपरीत रतन सुपर मार्केट नावाचे दुकान आहे.

महेश हा दुकानातील नोकरासमोर अनिलचा नेहमी अपमान करत होता. शिवाय आपल्या इच्छेविरुद्ध दुकानाचे कामकाज करत असल्यामुळे अनिलच्या मनात राग होता. या रागातून अनिलने दुकानातील दोन नोकरांच्या मदतीने जड वस्तूने डोक्यात फटके मारून महेशचा खून केला. वैद्यकीय अहवालात महेशची हत्या झाल्याचे उघड झाले. अनिलसह दुकानातील दोघा नोकरांविरुद्ध कोपरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) डी. एस. गावडे करत आहेत.

हे हि वाचा एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment