पत्नीवर चाकूहल्ला करणारा पोलिस पसार

On: April 10, 2022 10:24 AM

नाशिक : मनमाड येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचा-याने पत्नी, सासू व  सास-यावर घरगुती वादातून चाकू हल्ला केल्याप्रकरणी वावी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हल्लेखोर पोलिस पसार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. सुरज उगलमुगले असे हल्लेखोर पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. या हल्ल्यात जखमी झालेली त्याची पत्नी नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्या पाठीवर, मांडीवर आणि मानेवर झालेल्या चाकूहल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे.

मनमाड पोलिसात कार्यरत सूरज उगलमुगले हा दोडी येथे त्याच्या सासरी शुक्रवारच्या रात्री साडेदहा वाजता आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी माहेरीच मुक्कामी होती. बोलावून देखील ती सासरी नाशिकला का आली नाही या वादातून सुरजने वाद घातला होता. या वादातून त्याने चाकूने पत्नी पुजावर हल्ला केला. तिच्या बचावासाठी आलेले तिचे वडील निवृत्ती इंगळे, सासू शिला या दोघांवर देखील त्याने चाकू हल्ला केला. त्यानंतर तो फरार झाला. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment