चाकू हल्ल्यात तरुण जखमी

On: April 10, 2022 5:35 PM

जळगाव : मोबाईलचे पैसे घेण्यासाठी बोलावून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख इकबाल शेख कय्युम (36) असे जखमी फिर्यादी तरुणाचे नाव आहे.

साहिल नावाच्या तरुणाकडून इकबाल यास त्याच्या मोबाईलचे पैसे घ्यायचे होते. साहिल हा इकबाल यास पैसे देण्याकामी टाळाटाळ करत होता. अखेर साहिलने इकबाल यास 9 एप्रिलच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनी रिक्षा स्टॉप जवळ बोलावले. त्यानुसार इकबाल हा त्याठिकाणी गेला. दोघात शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी साहीलसोबत त्याचा साथीदार आसीफ हा देखील होता. आसिफ याने इकबालच्या कमरेवर आणि छातीवर चाकूने मारुन जबर दुखापत केली. याप्रकरणी इकबाल याने दिलेल्या फिर्यादीनुसार साहील व आसिफ या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला भा.द.वि. 326 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment