ठाणे : डीसीपी अविनाश अंबुरे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनु वर्गीस यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करीची मोठी कारवाई केली आहे. चितळसर पोलिस स्टेशन व गुन्हे शाखा ठाणे यांच्या पथकाने ड्रग्ज (गांजा) घेऊन जाणा-या ट्रकला ताब्यात घेत सदर कारवाईत केली आहे. जप्त केलेल्या ड्रग्जचे(गांजा) एकूण वजन (गांजा) 691 किलो आहे. या जप्त मुद्देमालाचे एकूण बाजार मुल्य 1.31 कोटी रुपये एवढे आहे. पोलिसांच्या पथकाने ड्रग्सची वाहतूक करणारा ट्रक (बाजार मूल्य 25 लाख रुपये) देखील जप्त केला आहे.