तिक्ष्ण हत्याराने पाचोरा शहरात एकाची हत्या?

जळगाव : तिक्ष्ण हत्याराने पाचोरा शहरात एकाची हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. संजय पंकज खेडकर (46) असे मयत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी मयताच्या मुलासह आईला ताब्यात घेतले असल्याचे समजते.

दरम्यान या घटनेने पाचोरा शहरात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खूनाचे जणू सत्र सुरु असल्याचे म्हटले जात आहे.जळगाव शहर पोलिस स्टेशनला दोन, रामानंंद नगर पोलिस स्टेशनला एक व एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक अशा खूनाच्या घट्ना दाखल झाल्या आहेत. दरम्यान पाचोरा शहरात देखील हल्ल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here