दिल्ली : राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज निधन झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरला उपचार सुरु होते. उपचारादरम्यान वयाच्या ६४ व्या वर्षी आज अमर सिंह यांनी शेवटचा श्वास घेतला. केंद्रात काँग्रेस प्रणित यूपीएचं सरकार असताना अमर सिंह नेहमी चर्चेत रहात होते.
मुलायम सिंह यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख होते. त्यावेळी अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात मोलाची भूमिका पार पाडत होते. सुपर स्टार अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे आणि सलोख्यके संबंध होते. कालांतराने दोघांचे संबंध बिघडले. त्याबद्दल नंतर सिंह यांनी माफीदेखील मागितली होती.
काही महिन्यांपासून अमर सिंह यांच्यावर सिंगापूर येथील एका रुग्णालयात आयसीयूत वैद्यकीय उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेत आपली जिवनयात्रा संपवली. ते उत्तर प्रदेश राज्यातून राज्यसभेवर निवडून आले होते. ५ जुलै २०१६ रोजी त्यांची खासदार पदी निवड झाली होती. समाजवादी पक्षापासून लांब गेल्यानंतर त्यांची राजकारणातील सक्रियता कमी कमी होत गेली. नंतर ते भाजपा पक्षाच्या जवळ गेले. देशात ज्यावेळी यूपीएचं सरकार होते त्यावेळी त्यांच्या शब्दला मान होता.
.