पुज्य साध्वीजी संवेगनिधीजी यांच्या रसाळ वाणीतून प्रवचनमाला

जळगाव : भगवान महावीर जन्मकल्यानक महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पुज्य साध्वीजी संवेगनिधीश्रीजी म.सा. यांच्या सुश्राव्य वाणीतून प्रवचनमाला सुरु आहे. स्वाध्याय भवनात सुरु असलेल्या प्रवचनमालेचे पहिले पुष्प 11 एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाले.

11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 10.15 या वेळेत झालेल्या या प्रवचनमालेत “जीवन जगण्याची जडीबुटी” हा विषय ठेवण्यात आला होता. या प्रवचन मालेचे आयोजक श्री जैन श्वेतांबर मुर्तीपुजक जैन संघ जळगाव होते. चांगले स्वप्न बघा, चांगले व्हा, चांगली गुंतवणूक करा आणि स्वत:ला चांगले बनवा या प्रमुख मुद्द्यांचा या प्रवचनमालेत समावेश होता. या प्रवचनात कस्तुरचंदजी बाफना, दिलीपजी गांधी, विजयजी कोटेचा, अजयजी राखेचा, भंवरलालजी संघवी, स्वरुपजी लुंकड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे 350 श्रोत्यांची उपस्थिती होती.

12 एप्रिल रोजी झालेल्या प्रवचनमालेत स्वभावाची सुंदरता हा विषय ठेवण्यात आला होता. पहिल्या व दुस-या दिवशी प्रवचनाला भरघोस उपस्थिती आणि प्रतिसाद मिळाला. पुज्य साध्वीजी संवेगनिधीजी म.सा.यांच्या रसाळ वाणीतून झालेल्या द्वितीय पुष्पाच्या प्रवचनात श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिल. कुणाचा अपमान करु नका, कुणाची उपेक्षा करु नका, कुणाला त्रास देऊ नका, कुणाला घायाळ करु नका, कुणाच्या विषयात दखल देऊ नका हे विषय या पुष्पात घेण्यात आले होते. यावेळी सुमारे चारशे श्रोतागण उपस्थित होते. सुत्रसंचालन कस्तुरचंदजी बाफना, दिलीपजी गांधी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here