एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून

On: August 1, 2020 8:24 PM

पिंपरी : एकतर्फी प्रेमातून महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड – अजिंठानगर भागात घडली. घटनेनंतर आरोपीने स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव राणी सतीश लांडगे (29) अजिंठानगर, चिंचवड असे आहे.  अरविंद शेषराव गाडे (30) अजिंठानगर असे हत्या करणा-या तरुणाचे नाव आहे.

आरोपी अरविंद हा गेल्या सहा महिन्यांपासून मयत राणी हिस आपल्यासोबत बोलण्यासाठी मागे लागला होता. तिच्याकडून त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तो चिडला होता. संतापाच्या भरात अरविंदने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. अरविंदच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून राणीने आपला मोबाईल नंबर देखील बदलला होता. त्यामुळे त्याचा तिच्यासोबत संवाद साधण्याचा मार्ग थांबला होता.

अखेर त्याने तिला संपवण्याचा मार्ग पत्करला. राणीचा खून केल्यानंतर त्याने स्वत:वर देखील चाकूने वार केले. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहे. राणीचा खून करणारा अरविंद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. एका खासगी कंपनीत तो वाहनचालक आहे. राणीला तीन मुले असून ती एका शाळेत मदतनीसाची नोकरी करत होती.

हे हि वाचा नोकरांच्या मदतीने मोठ्या भावाचा खून ; तिघांना अटक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment