औरंगाबाद : मटका व्यावसायिकाकडे दहा हजार रुपयांची मागणी करणा-या वाळूज पोलिस स्टेशनच्या डीबी कर्मचा-याला एसीबी ट्रॅपची कुणकुण लागताच तो नॉट रिचेबल झाला आहे. तो नॉट रिचेबला असला तरी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहंमद सलीम हैदर शेख (32) असे फरार डीबी कर्मचा-याचे नाव आहे. सापळा लागण्यापुर्वीच तो कॉल डायव्हर्ट करुन पसार झाला. ज्या पोलिस स्टेशनला तो कार्यरत आहे त्याच पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुर्काबाद खराडी परिसरात मटका, जुगार व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दहा हजार रुपये मासिक हप्त्याची मागणी मोहमंद सलीम याने तक्रारदाराकडे केली होती. मात्र मटका, जुगार व्यावसायिकाने त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सलीमने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तक्रारदाराला बोलावून सापळा लावला. मात्र ट्रॅपची कुणकुण लागताच सलीम फरार झाला.