तरुणीच्या पित्याची हत्या प्रकरणी तिघे जेरबंद

On: April 15, 2022 9:32 AM

केज : मुलीसोबत लग्न करुन देण्यास नकार देणा-या पित्याची हत्या करुन पलायन करणा-या तिघांना पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून अटक केली आहे. भागवत चाटे याच्यासह शिवशंकर इंगळे (28) रा. इंगळे वस्ती, केज, रामेश्वर लंगे (29), रा. जहागीर मोहा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

रमेश नेहरकर यांनी त्यांच्या मुलीचे लग्न लावून देण्यास नकार दिल्यामुळे त्यांची रॉडने हल्ला करत हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर भागवत चाटे व त्याचे दोघे साथीदार फरार झाले होते. मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांना वाघोली (पुणे) येथून अटक करण्यात आली आहे. पुढील तपासकामी त्यांना केज पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले आहे. अटकेतील तिघांना 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment