बॉलीवुड तारका कंगना राणावत हिने सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीसह गटबाजीला विरोध केला होता. तेव्हापासून ती चर्चेत आली होती. कंगना राणावतच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त आले आहे.
कंगना राणावत सध्या तिच्या कुल्लू येथील निवासस्थानी रहात आहे. गुरुवारी रात्री तिला तिच्या घराबाहेर गोळीबाराचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला तिला फटाके फुटत असल्याचा भास झाला. मात्र या दिवसात कुल्लू येथे पर्यटक येत नाही. त्यामुळे या शांत वातावरणात आवाजामुळे तिने सुरक्षा रक्षकाला बोलावले. आपल्याला घाबरवण्यासाठी हा प्रकार केला असावा असे तिचे म्हणणे आहे.