प्रेयसीच्या मुलीवर अत्याचार करणा-या प्रियकरास अटक

On: April 20, 2022 8:36 AM

नाशिक : प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर अनैसर्गीक अत्याचार करणा-या प्रियकरास मुंबई नाका पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. शिवाजी साळवे (मुळ रा.परभणी) असे सध्या पोलिस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेला तिच्या पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहे. गेल्या दीड वर्षापासून या महिलेचे संशयित आरोपी असलेल्या शिवाजी साळवेसोबत प्रेमसंबंध जुळले. दरम्यान प्रेयसीच्या गैरहजेरीत तिच्या अल्पवयीन मुलीवर शिवाजीची वक्रदृष्टी पडली. त्याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत त्या घटनेचे चित्रीकरण केले. त्यानंतर या विकृताची वक्रदृष्टी या बालिकेच्या लहन भावावर देखील पडली. त्याने त्याला देखील तसे कृत्य करण्यास भाग पाडून त्याचे मोबाईलमधे चित्रीकरण केले. हा प्रकार प्रेयसीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले. सध्या संशयित आरोपी शिवाजी साळवे पोलिस कोठडीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment