लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेल्या गर्भवतीची आत्महत्या

On: April 20, 2022 10:29 AM

औरंगाबाद : पती, सासू, दिर व नणंदेकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेल्या पाच महिन्याच्या गर्भवतीने आत्महत्या केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचल विशाल रिडलॉन (22) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. पती विशाल रिडलॉन, दीर विकी व नणंद रीना यांना अटक करण्यात आली आहे.

लग्नानंतर दोन वर्षातच विवाहीता आचल हिचा सासरच्या मंडळींकडून अतोनात छळ सुरु झाला होता. ती पाच महिन्याची गर्भवती असतांना देखील तिचा छ्ळ सुरु होता. या त्रासाला कंटाळून गळफास घेत तिने आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली. मुळ नांदेड येथील रहिवासी असलेल्या आचलचे नोव्हेंबर 2020 मध्ये विशालसोबत लग्न झाले होते. वराहपालन करणारा विशाल हा कंत्राटी पद्धतीने स्वच्छतेचे काम देखील करतो. सदर घटना उघडकीस आल्यानंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला मयत घोषित करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment