एखाद्या प्रॉडक्टची एक्स्पायरी डेट संपल्यानंतर देखील त्याच प्रॉडक्टवर नव्याने बनावट एक्स्पारी डेट टाकून कशाप्रकारे लुट केली जाते याबाबत एक व्हिडीओ शेयर केला जात आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याचा तपास अजून लागु शकला नाही. मात्र अशा प्रकारे बनावट एक्सपायरी डेट टाकून विक्री केल्या जात असलेल्या वस्तू मॉलमधे कमी किमतीत डिस्काऊंटच्या नावाखाली विक्री केल्या जात असल्याचे समजते. तरी ग्राहकांनी याबाबत सतर्क रहावे असे म्हटले जात आहे.