अंकिता लोखंडेने उघडले मौन व्रत………

On: August 2, 2020 3:43 PM

बऱ्याच दिवसांपासन शांत असलेल्या अंकिता लोखंडेने तिचे मौन व्रत उघडले आहे. सुशांतच्या अंत्यविधीला अंकिता हजर नव्हती.आता तिने त्याच्या अंत्यविधीला हजर न राहण्याचे कारण सांगितले आहे.तिने म्हटले आहे की मी सुशांतला त्या कधीही त्या अवस्थेत पाहिले नसते. मी त्याला त्या अवस्थेत पाहिले असते तर मी कधीच विसरु शकले नसते.

पवित्र रिश्ताच्या सेट वर सोबत काम करतांना सुशांत आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सुशांतने त्याच्या करीयरमधे खुप मेहनत घेतली आहे. पवित्र रिश्ता ही मालिका सोडल्यानंतर तो तीन वर्षे घरी बसून होता. त्याच्या जवळ काहीच काम नव्हते. त्याने बॉलीवुड मधे येण्यासाठी खुप मेहनत घेतली होती. तो अस करुच शकत नाही. जर त्याला असेच काही करायचे असते तर त्याने केव्हाच आत्महत्या केली असती असेही तिने म्हटले आहे.

त्या दिवशी मलाअचानक एका पत्रकराचा फ़ोन आला. त्या पत्रकारानेच मला सुशांतच्या आत्महत्येची बातमी दिली. मला धक्काच बसला. सुशांत असे करेल याचा मी कधी विचार केला नव्हता. काय करू,काय बोलू ,काहीच समजत नव्हते,फक्त रडायला येत होते. त्याच्या अंत्यविधीला मी जावू शकत नव्हते. त्याला त्या अवस्थेत बघणे माझ्यासाठी शक्यच नव्हते. असे ती पुढे म्हणाली. सुशांत आणि अंकिता जवळपास ६ वर्ष रिलेशनशिपमधे होते. तो डिप्रेशनमधे जावू शकत नाही असे अंकितने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment