महिलेवर सामूहिक बलात्कार

On: August 2, 2020 7:19 PM

भिवंडी : भिवंडी तालुक्याच्या गोदाम पट्ट्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत 42 वर्षीय महिलेवर पाच जणांच्या सामुहिक अत्याचार प्रकरणी चार नराधमांना अटक करण्यात आली आहे. शस्त्राचा धाक दाखवून झालेल्या अत्याचार प्रकरणी रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. नारपोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच या घटनेतील चौघा नराधमांना अटक करण्यात आली आहे. यातील एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. फरार आरोपीचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.

नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने  नराधम आरोपी माँटी कैलास वरटे ( 25) विशाल कैलास वरटे ( 23), कुमार डाकू राठोड ( 25) अनिल कुमार शाम बिहारी गुप्ता (28) यांना ताब्यात घेण्यात आले. नारपोली पोलीस स्टेशनला भा.द.वि. 376(ड), 341, 324, 323 नुसार अटक करण्यात आली. त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 8 ऑगस्टपावेतो पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment