नाशिक : केंद्र सरकारच्या विविध विभागातील लाचखोर अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करण्यासाठी सीबीआयच्या एसीबी कार्यालयाची स्थापना नाशिक येथे होणार आहे. केंद्र सरकारच्या लाचखोर अधिकारी, कर्मचा-यांवर सापळे लावण्याकामी या कार्यालयातील पथक कार्यरत राहणार आहे.
तक्रारदारांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीच्या तक्रारी करण्यासाठी मोबाईल व्हाटसअॅप क्रमांकाची सोय करुन देण्यात आली आहे. 8433700000 या व्हाटस अॅप क्रमांकावर अथवा 022-26543700 या लॅंड लाईन क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. याशिवाय [email protected] या मेलवरही तक्रार करण्याची सोय करुन देण्यात आली आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल. कार्यालयाची स्थापना होईपर्यंत प्रत्येक महिन्यात हे पथक नाशिकला येईल. 4 व 5 मे रोजी नाशिकच्या एसबीआय मुख्य शाखेत सातपुर कार्यालयात या विभागाचे पथक दोन दिवस मुक्कामी राहून नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत सीबीआय एसीबीचे पोलिस निरीक्षक रंजीतकुमार पांडेय, गजानन देशमुख, जे प्रेमकुमार आदींसह नाशिक एसीबीचे अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर अधिक्षक नारायण न्याहळदे, उप अधिक्षक नरेंद्र पवार उपस्थित होते.