विष प्राशनातून तरुणाने संपवले जिवन ; पाळधीला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विष प्राशनातून तरुणाने संपवले जिवन ; पाळधीला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : धरणगाव तालुक्यातील धार या गावी दोघा शेजा-यांमधील वादातून एकाने आत्महत्या केल्याची  घटना काल रात्री घडली. शेजा-याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून, पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याच्या भावनेतून व आपले कुणी काहीच करु शकत नाही असे शेजा-याचे बोलणे ऐकून त्रस्त तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केल्याचा प्रकार धरणगाव तालुक्यातील धार या गावी काल रात्री घडला.

याबाबत वृत्त असे की धार या गावी संभाजी साळुंखे हे आपल्या परिवारासह रहात होते. त्यांच्या घराशेजारी  कैलास मंगा साळवे हे राहतात. कैलास साळवे यांच्या घराच्या पत्र्यावर संभाजी साळूंखे यांच्या बांधकामाचे मटेरियल पडले. या कारणावरुन शेजारी राहणारे सरलाबाई कैलास साळवे, शितल कैलास साळवे, पुजा कैलास साळवे, पुनम कैलास साळवे या चौघांनी संभाजी साळुंखे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यावर संभाजी साळूंखे यांची पत्नी उषाबाई साळूंखे हिने साळवे परिवाराला म्हटले की तुम्ही तुमच्या घराच्या पत्र्यावर आम्हाला पाय सुध्दा ठेवू देत नाही. आता तुमच्या घराच्या वरंडीचे काम कसे होईल?

त्यावर साळवे परिवारातील चौघा महीलांनी मिळून उषाबाई साळूंखे यांना मारहाण व शिवीगाळ तसेच बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत उषाबाई साळुंखे यांनी पाळधी दुरक्षेत्रात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा क्रमांक 245/20 भा.द.वि. 323, 504, 506 नुसार दाखल करण्यात आला.

त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास साळूंखे परिवाराकडे शेजारी राहणारे कैलास मंगा साळवे यांनी येवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर संभाजी साळूंखे यांनी शिवीगाळ करु नका असे साळवे यांना म्हटले. त्यावर साळवे यांनी तुमच्याकडून माझे काहीच होणार नाही. मी संबंधीतांना पैसे दिले असल्याचे बोलून सर्व साळुंखे परिवाराला शिवीगाळ करु लागला.

आपल्या तक्रारीची पोलिस दखल घेत नसल्याची भावना संभाजी साळूंखे यांची झाली. संभाजी साळूंखे यांचे मानसिक खच्चीकरण झाले. शनिवरी रात्री नऊ वाजता ते पत्र्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेले ते कायमचेच. रात्री दहा वाजता त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा झोपण्यासाठी गेला असता त्यास विषारी औषधाचा वास आला. त्याने पाहिले असता त्याचे वडील संभाजी साळूंखे यांच्या तोंडातून फेस निघत होता. त्यांनी विषारी औषध प्राशन केले असल्याची सर्वांची खात्री झाली. त्यांना तात्काळ जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यानी त्यांना मयत घोषीत केले.

आज 2 ऑगस्ट रोजी मयत संभाजी साळुंखे यांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आले. आत्महत्येस प्रवृत्त करण्यास भाग पाडणा-या साळवे परिवारातील सदस्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला. या प्रकरणी उषाबाई साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार कैलास मंगा साळवे, सरलाबाई कैलास साळवे, शितल कैलास साळवे, पुजा कैलास साळवे, पुनम कैलास साळचे (सर्व रा. धार ता.धरणगांव) यांच्या विरुद्ध 306, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here