पोलिसाची 48 हजारात ऑनलाईन फसवणूक

On: April 30, 2022 8:21 PM

अकोला : अकोला पोलिस मुख्यालयातील कर्मचा-याची 48 हजार 727 रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याप्रकरणी रामदास पेठ पोलिस स्टेशनला बॅंकेच्या अज्ञात कर्मचा-याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष भीमराव नप्ते असे फसवणूक झालेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.

इंडिया बुल्स बँकेचा कर्मचारी असल्याचे पलीकडून फोनवर बोलणा-याने संतोष नप्ते यांना सांगितले. धनी क्रेडीड कार्ड ऑनलाईन पद्धतीने सक्रीय करण्यासाठी पलीकडून बोलणारा सांगत होता. त्याप्रमाणे पोलिस कर्मचारी इकडे प्रक्रिया करत होता. सुरुवातीला नप्ते यांच्या बॅंक खात्यातून दहा हजार रुपये परस्पर गायब झाले. नंतर सोळा हजार व इतर दिवशी धनी फ्रीडम कार्डमधून बावीस हजार रुपये परस्पर कमी झाले. एकंदरीत 48 हजार 727 रुपये परस्पर वळते झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पोलिस कर्मचारी नप्ते यांच्या लक्षात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment