जळगावचे दोघे तरुण बुडाले गोदावरीत

On: May 1, 2022 8:59 AM

नाशिक : नाशिक येथे कामकाजानिमित्त आलेले जळगाव येथील दोघे तरुण दुचाकीसह गोदावरी नदीत बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ते तरुण जळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश सुरेश निकम (23) आणि योगेश दुसाने(24) अशी त्यांची नावे आहेत. आडगाव पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

आडगाव येथून द्वारका सर्कलच्या दिशेने दुचाकीने दोघे तरुण येत होते. दरम्यान कन्नमवार पुलाजवळ पात्रानजीक दोघांनाही रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दुचाकीसह नदीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्र असल्यामुळे हा प्रकार कुणाला लवकर समजला नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी शोधकार्य राबवत दोघांचे शव बाहेर काढले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment