मद्यपानाच्या चौकशी दरम्यान पोलिस बेपत्ता

On: May 4, 2022 8:35 AM

धुळे : जळगावच्या दादावाडी परिसरातील रहिवासी व मिरा भाईंदर आयुक्तालयातील पोलिस कर्मचारी धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातून बेपत्ता झाला आहे. किरण संजय चौधरी (रा. दादावाडी कल्याणी नगर जळगाव) असे बेपत्ता नव प्रविष्ठ पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. याप्रकरणी मिसींग दाखल करण्यात आली आहे.

काही दिवसांपुर्वी किरण चौधरी हा पोलिस प्रशिक्षण केंद्रात मद्याच्या नशेत आढळून आला होता. त्यामुळे राखीव पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी त्याच्या विरुद्ध धुळे शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास सुरु असतांना तो आता बेपत्ता झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment