जळगाव : जळगाव शहरातील नविन सम्राट कॉलनी भागात एका महिलेच्या घरी ती चालवत असलेल्या कुंटणखान्यावर बनावट ग्राहकाच्या मदतीने 4 मे रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत जागा उपलब्ध करुन देणा-या घर मालकीन महिलेसह दलाल महिला व एक पिडीत महिला अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले.
सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सपोनि अमोल मोरे, पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे, पोलिस उप निरीक्षक सुनिल पाटील, हे.कॉ. किरण धमके, पोलिस नाईक रविंद्र मोतीराया, महेश महाले, हे.कॉ. मिनल साखळीकर, महिला हे.कॉ.मालती वाडीले, महिला पो.कॉ.अर्चना पाटील, राजश्री बाविस्कर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.