गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

On: May 5, 2022 3:20 PM

जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातून गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास एलसीबी पथकाने अटक केली आहे. निलेश उर्फ सुपड्या चंद्रकांत ठाकुर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून विस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्या विरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार अधिनियम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. जालिंदर पळे, पोना प्रितमकुमार पिताबर पाटील, पोना विजय शामराव पाटील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपासकामी त्याला रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment