मयताची ओळख पटवण्याचे आवाहन

On: May 5, 2022 6:31 PM

जळगाव : शेतातील विहीरीच्या पाण्यात तरंगतांना आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम एमआयडीसी पोलिसांकडून सुरु असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.

जळगाव शहरानजीक मन्यारखेडा शिवारातील पंढरपूर नगरच्या पुढे एका शेतातील विहीरीत एका इसमाचा मृतदेह 4 मे रोजी सायंकाळी आढळून आला. या घटनेची माहीती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांचे गुन्हे शोध पथक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. विहीरीत पोहता येणा-या तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील कारवाईकामी मृतदेह सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकम्सात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

मयत तरुण अंदाजे 35 ते 40 वयोगटातील असून त्याच्या अंगात लाल रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅंट परिधान केलेली आहे. रंग सावळा व उंची 5 फुट 5 इंच तसेच मध्यम बांधा आहे. गळ्यात काळ्या रंगाचा दोरा व उजव्या हातात मण्यांची माळ व स्टीलचे कडे आहे. कुणाला या प्रकरणी काही माहिती असल्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनला 0257- 2210500 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment