चाकूच्या बळावर दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास अटक

On: May 6, 2022 7:04 AM

जळगाव – चाकूचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पराग प्रकाश लोहार (20) रा. योगेश्वर नगर ज्ञानचेतना अपार्टमेंट खेडी जि जळगाव असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मद्याच्या अंमलाखाली 13 इंच लांबीच्या धारदार चाकूसह अटक करण्यात आलेल्या पराग लोहार यास महामार्गावर गोदावरी कॉलेज नजीक हॉटेल तनय येथून 5 मे रोजी अटक करण्यात आली.

पोलीस कर्मचारी मुकेश अनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट 4/25 व मुंबई पोलीस अधिनीयम कलम 37 (1) (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.अतुल रघुनाथ वंजारी, स.फौ.आनंदसिंग पाटील, पोना. मुद्दसर काझी, पोना. गणेश शिरसाळे, पोना. किशोर पाटील, पोना.  विकास सातदीवे, पोना योगेश बारी, पोकॉ.  गोविंदा पाटील, पोकॉ.  साईनाथ मुंढे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment