चोरीच्या तिन मोटार सायकलींसह चोरटा अटकेत

On: May 6, 2022 10:11 PM

जळगाव : चोरीच्या तिन मोटार सायकलींसह चोरट्यास चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. रतन दगडू अहिरे रा. रांजणगाव ता. चाळीसगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या तिन मोटार सायकलींपैकी एक मोटार सायकल चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील आहे.

आलिम कुतुबुद्दीन टकारी रा. रांजणगांव ता. चाळीसगांव यांची मोटार सायकल चोरीला गेली होती. या चोरीप्रकरणी त्यांनी फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे रतन अहिरे यास चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्याने मोटार सायकल चोरीची कबुली दिली. अटकेनंतर त्याने चोरीच्या तिन मोटार सायकली काढून दिल्या. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनखाली पो उप निरीक्षक लोकेश पवार, स.फौ. राजेंद्र शंकरराव साळुंखे, पोहेकाँ नितीन श्रीराम सोनवणे, पोना शंकर दिनकर जंजाळे, पोना मनोज भगवान पाटील, पोना संदीप अशोक माने, पोना संदीप पाटील आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास तसेच आरोपीच्या अटकेकामी सहभाग घेतला. पुढील तपास हे.कॉ. नितीन सोनवणे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment