पुसदनजीक आढळला तरुणाचा मृतदेह

On: May 8, 2022 10:33 AM

पुसद : पुसद शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोपरा फाट्यानजीक असलेल्या नाल्यामधे शनिवार 7 मे च्या सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मयत तरुण महागाव तालुक्यातील सवना येथे राहणारा असल्याबाबत ओळख पटली आहे. अंकुश संजय हनवते (25) असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या खिशात आढळून आलेल्या विज बिलावरुन त्याची ओळख पटली.

अंकुश हनवते हा त्याची पोखरी येथे राहणा-या मावशीकडे 5 मे रोजी गेला होता. खर्षी येथे माहेरी गेलेल्या पत्नीसोबत संपर्क साधत तिला वेणी येथे येण्यास सांगितले होते. पत्नी आली नसल्याने हुडी पोखरी येथून तो 6 मे च्या सकाळी रिक्षाने घरी येण्यास निघाला. ज्या रिक्षात तो बसला होता त्या रिक्षा चालकाची पोलिसांनी विचारपूस केली. अंकुश हा कोपरा फाट्यावर उतरला होता असे रिक्षा चालकाने सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment